१) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के गांव हागणदारीमुक्त करणे.

२) कर वसुली शंभर टक्के पूर्ण करणे.

३) शुद्ध पाणी पुरवठा करणे.

४) दलीत वस्ती आराखड्याप्रमाणे सोयी सुविधा पुरविणे.

५) व्यसनमुक्त गांव करणे.

६) वृक्ष लागवड करणे.

७) निरनिराळ्या योजनेत सहभागी होणे.

८) तंटामुक्त गांव ठेवणे.

९) नागरीकांना संगणकीकृत ऑनलाईन सेवा उपलब्ध करणे.

१०) स्वच्छ गांव, सुंदर गांव तयार करणे.

आपले नेते ओळखा – प्रत्येक सदस्याची ओळख

 सरपंच

 श्री मारुती बंडू रेकुलवार हे ग्रामपंचायत लांजी येथील सरपंच असून प्रत्येक कार्य हे वेळेत पूर्ण करणे तसेच ग्राम पंचायत कर्मचारी अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची खुबी यांच्यामध्ये आहे. ग्रामपंचायतला प्रत्येक स्पर्धेमध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असतात. ग्रामपंचायतीला मंदिर मानणारे सरपंच हे सदैव कर्तव्यदक्ष असून ग्रामस्थांची नेहमी समस्या सोडवण्यात कटिबद्ध राहतात.

 ग्रामपंचायत अधिकारी

 श्रीमती साधना अशोकराव तावडे ह्या ग्रामपंचायतीलांजीच्या ग्रामपंचायतीत अधिकारी असून प्रत्येक दिवशी कार्यालयात उपस्थित राहून वेळेत काम पूर्ण करणे ही शिस्त त्यांच्यामध्ये आहे. ग्रामपंचायतीचे काम आवडीने पूर्ण करून प्रत्येक स्पर्धेमध्ये अग्रेसर ठेवण्याचा त्यांचा मनापासून प्रयत्न असतो.

 गावातील प्रत्येक व्यक्तीचे काम वेळेतच पूर्ण व्हावे याकडे जास्त लक्ष देतात.

 ग्रामपंचायत सदस्य

 ग्रामपंचायत सदस्य हे प्रत्येक वार्डातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि वेळोवेळी ग्रामपंचाय ती मासिक सभा ग्रामसभा पूर्ण करण्यासाठी मदत करून प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचे सहकार्य त्यांचे असते.

 ग्रामपंचायत कर्मचारी

 ग्रामपंचायत कर्मचारी हे नियमित स्वच्छता व गावाला पाणीपुरवठा वेळेत करतात.

 संगणक परिचालक

 श्री रवींद्र प्रतापसिंह डोबवाल हे संगणक परिचालक असून ग्रामपंचायती 100% ऑनलाईन करण्यावर त्यांचा मनापासून प्रयत्न असतो. गावातील लोकांना वेळेत प्रत्येक सुविधा ऑनलाईन दिली जाते. सर्व स्पर्धेमध्ये महत्त्वाचा रोल यांचा असतो.