भूमिका व जबाबदाऱ्या – कोण काय करते?
ग्राम पंचायत अधिकारी
1.ग्रामपंचायत सचिव म्हणुन वित्तीय सल्लागार म्हणुन काम पाहणे.
2.ग्रा.पं.चे सर्व अभिलेख जतन करणे.
3.ग्रामसभा, मासिक सभा ग्रामपंचायत ने ठरवून दिल्यानुसार घेणे.
4.फेर आकारणी व कर वसुली करणे.
5.ग्राम पंचायतीच्या हद्यीतील जमिन, रस्ते. इमारती पडीत जागा आणि सार्वजनिक इतर जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे.
6.ग्रामदर्शक नकाशा ठेवणे.
7.लेखा परिक्षण शक पुर्तता करणे.
8.जन्म-मृत्यु, उपजत मृत्यु नोंदणी करणे.
9.विवाह नोंदणी करणे.
10.वार्षिक कृती आराखडा तयार करणे.
11.निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करणे.
12.शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सुचना व आदेश यांचे पालन करणे.
13.योजनांची अंमलबजावणी करणे.
14.विविध योजना राबविणे.
15.अधिनीस्त कर्मचाऱ्यांवर नियत्रंण ठेवणे.
सरपंच
१ पंचायतीने संमत केलेले ठराव आमलात आणणे.
२ पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्य रितसर पार पाडण्याची जवाबदारी आहे.
३ पंचायतीच्या सभा बोलाविणे, सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे व सभेचे नियमन करणे.
४ पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांनी केलेली कार्यवाही करणे व नियंत्रण ठेवणे.
५ आवश्यक असलेली सर्व विवरण पत्र व प्रतिवृत्ते तयार करण्याची व्यवस्था करणे.
६ ग्रामसभेच्या बैठकी बोलावणे व सदर बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे.
७ शासनाच्या कोणत्याही निर्देशान्वये देणे आवश्यक असतील अशी प्रमाणपत्रे देणे.
८ सचिवाच्या ताब्यात नोंदवहया ठेवणे, त्यावर देखरेख ठेवणे व वेळोवेळी तपासणे.
९ शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.
उपसरपंच
1.सरपंचाच्या अनुपस्थितीत पंचायतीच्या सभा बोलावणे, सभेचा अध्यक्ष म्हणुन काम पाहणे व सभेचे नियमन करणे.
2.सरपंचाच्या अधिकारापैकी व कर्तव्यपैकी सरपंच यांनी वेळोवेळी सोपविलेले कर्तव्य पार पाडणे.
3.सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसभा बोलावणे व अध्यक्ष म्हणुन काम पाहणे.
4.सरपंचाची निवडणूक होईपर्यत किंवा सरपंच गावात सतत १५ हून अधिक दिवस अनुपस्थित असेल किंवा तो काम करण्यात असमर्थ असेल तर सरपंचाच्या अधिकाराचा वापर करुन त्याचे कर्तव्य पार पाडणे.
ग्रामपंचायत सदस्य
१) ग्रामपंचायतीकडून मासिक सभेची नोटीस, सभेपूर्वी किमान तीन दिवस अगोदर सदस्यांना प्राप्त करण्याचा अधिकार असते.
२) सभेची नोटिस मिळाल्यावर यातील विषयांचा अभ्यास करून त्यावर विधायक चर्चा घडवून आणण्यास सहभागी होणे.
३) सभेतील चर्चेमध्ये आवर्जून सहभाग घेऊन संबंधित विषयावर /ठरावावर आपली मत मांडणी करण्याचा अधिकार ग्रामपंचायत सदस्याला असतो.
१४) सभेतील ठरावांच्या मंजुरीसाठी मत देणे किंवा मतावर सदस्य होणे.
५) आवश्यक असल्यास ग्रामपंचायतीची कागदपत्रे पाहण्यासाठी/तपासणी करणे यासाठी मागणी करणे.
६) ग्रामपंचायत मालमत्ता व निधी यांच्या गैरवापरास प्रतिबंध करणे. चुकीच्या कारभाराला विरोध करणे.
७) ग्रामपंचायत कार्य करण्याची इच्छा राहिली नाही तर आपल्याला सदस्यपदाचा राजीनामा देणे.
८) ग्रामपंचायतीने वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
९) सभेपुढे मांडावयाचे विषयांबाबत सरपंचांना पाच दिवस अगोदर लेखी पत्र देणे.
१०) सभा सुरू होण्यापूर्वी सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे व ती पूर्ण होईपर्यंत राहिली पाहिजे.
११) आपल्या वार्ड मधिल नागरीकांना ग्रामसभा बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे.
१२) ग्रामपंचायतीने बोलविलेल्या प्रत्येक मासिक सभा व ग्रामसभेत उपस्थित राहणे व कामकाजात भाग घेणे.
ग्रामपंचायत कर्मचारी
१. ग्रामपंचायत कार्यालयातील रजिस्टर्स / फाईल्स / दस्ताऐवज तसेच पुस्तके व किल्ली यांचे योग्य जतन करणे / निगा राखणे
२. संबंधिताना त्यांचे कामाच्या ठिकाणी / कार्यालयात वेळेत उपस्थित राहुन त्यांचेकडे दिलेले काम वेळेत पुर्ण करणे. सदर काम निष्ठा प्रामाणिकपणे पार पाडणे.
३. कामाच्या ठिकाणी वेळेवर येणे. तसेच कार्यालयीन वेळेपर्यंत काम करणे.
४. कार्यालय सुरु होण्यापुर्वी १० मिनीटे अगोदर उपस्थित राहुन साफसफाई, टेबल्स, कपाट इ. फर्निचरची सफाई करणे.
५. कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करणे. गावांमधील दिवाबत्तीकडे लक्ष ठेवून दुरुस्ती बाबत ग्रामपंचायतीकडे माहीती देणे.
पाणीपुरवठा कर्मचारी
१. गावात सुरळीतपणे व शुध्द पाणीपुरवठा करणे.
२. पाणीपुरवठा लिकेजची माहीती ग्रामपंचायतीस देऊन ग्रामपयतीच्या मदतीने दुरुस्त करणे.
३. गावांमधील पाणी स्त्रोताचे नमुने घेण्यास मदत करणे.
४. उपरोक्तशिवाय ग्रामपंचायतीने वेळोवेळी माहीती देणे.
संगणक परीचालक कर्मचारी
१. गावकऱ्यांचे विविध दाखले जसे जन्म दाखला, मृत्यु दाखला, विवाह नोंदणी, दारिद्रय रेषेखालील असल्यास दाखला, नमुना ८ चा दाखला मिळवून देणे.
२. ग्रामपंचायत कार्यालयातील ऑनलाईन माहीती व्यवस्थापन करणे.
३. गांवातील लोकांना ऑफलाईन माहिती देण्यास मदत करणे.
